भवानीनगर : यंदा झालेली अतिवृष्टी आणि येथील इंदापूर तालुक्यातील भीमा आणि नीरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. दुष्काळात जनावरांना चार्यासाठी उस तोडण्यात आला होता. त्यामुळे नोव्हेंबर 2019 पासून सुरु होणार्या यंदाच्या गळीत हंगामावर याचा परिणाम होणार असून सर्वच साखर कारखान्यांपुढे यंदाच्या गळीत हंमागाचे आव्हान आहे.
इंदापुर तालुक्यात जेवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तेेवढीच दुष्काळाची दाहकताही होती. यामुळे जनावरे जगवण्यासाठी चारा म्हणून शेतकर्यांनी ऊस पिकाचा वापर केला. शिवाय पुराच्या तडाख्यात तालुक्यातील बहुतांशी ऊसक्षेत्र सापडले आहे. भीमा आणि नीरा नदीकाठावरील ऊसाला पूराचा मोठा फटका बसला आहे. यामुळे आता नोव्हेंबर महिन्यातील गळीत हंगामासाठी ऊसासाठी मोठी स्पर्धा होणार आहे.
इंदापुरात पावसाचे प्रमाण कमीच असल्यामुळे कालव्यांच्या आवर्तनावर आणि नदीच्या पाण्यावर ऊसाची लागवड केली जाते. पण यंदा पूरस्थितीमुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. यातून गळीत हंगाम पार पाडण्यासाठी सांघिक प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा, ऊसाची पळवापळवी होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे. यामुळे ऊस उत्पादक चिंतेत आहेत.
जनावरांच्या चार्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसतोड केल्याने शेतामध्ये गाळपासाठी उपलब्ध असणार्या ऊसपिकात घट होणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.