जिल्ह्यात नवीन साखर कारखाने उभे करण्याची मागणी

कुशीनगर : कुशीनगर जिल्ह्यात साखर कारखाने सुरु करावेत, अशा मागणीचे पत्र भाजपा नेत्या सुनीता गौड यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहे. त्यानुसार एका साखर कारखान्यासाठी 60 एकर जमीनीची आवश्यकता आहे. कुशीनगर येथे पडरौना तहसील अंतर्गत जनपद मध्ये 300 एकर जमीन आहे, तसेच उस शोध संस्थान ची लक्ष्मीपुर मध्ये 70 एकर जमीन आहे. या दोन्ही जमीनींचा वापर साखर कारखान्यासाठी होवू शकतो. शिवाय कुशीनगर जिल्ह्यात ऊसाचं सर्वाधिक उत्पादन केलं जाते.

देवरिया जिल्ह्यात ऊसाची लागवड अधिक झाल्यामुळे पडरौना जिल्हादेखील ऊसाचा जिल्हा झालेला होता. या जिल्ह्यात 9 साखर कारखाने होते. ज्यामध्ये सेवरही, कटकुईया, पडरौना, रामकोला खेतान, रामकोला त्रिवेणी, लक्ष्मीगंज, कप्तानगंज, खड्डा, छितौनी या गावात कारखाने होते. यामधील कटकुईया आणि पडरौना येथील कारखाने ब्रिटीश इंडिया कार्पोरेेशनने सुरु केले होते, जे आता बंद आहेत.

पुढे उत्तर प्रदेश राज्य साखर निगम यांनी सुरु केलेले कारखानेही बंद पडले. कारखाने बंद झाले असले तरी ऊस क्षेत्र कमी झाले नाही, उलट कुशीनगरातले शेतकरी ऊसाची लागवड करुन त्याद्वारे गुळाचे उत्पादन घेवू लागले. पण यांचा अर्थिक विकास खुंटला आणि साखर कारखानेही बंद झाले. यामुळे जिल्ह्यातील ऊस शेतकर्‍यांची अर्थिक बाजू कमकुवत झाली. यासाठीच साखर कारखाने पुन्हा सुरु करणे आवश्यक असल्याचे सुनीता गौड यांनी पत्रात लिहिले आहे

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here