कोल्हापूर : यंदाच्या अतिवृष्टीमुळे ऊसाचे पिक पूर्णपणे खराब झाले आहे, यासाठी आता ताज्या ऊसाची लागवड करणे आवश्यक असल्याचे NCP अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तसेच पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत अशी मागणीही त्यांनी केली.
पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. इतर पिकांबरोबर कितीतरी हजार हेक्टर क्षेत्रातील ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान सरकारने भरुन देण्यासाठी एनसीपीने सरकारकडे मागणी केली आहे.
धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृृत्वाखालील शिष्ट्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ऊसासाठी प्रति हेक्टर १ लाख रुपयाची मागणी केली आहेे. तसेच पूराखाली आलेली जमीन शेती योग्य बनवण्यासाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर ची मागणी केली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.