लखनऊ : उत्तर प्रदेशातील तीन साखर कारखान्यांकडे उस शेतकर्यांचे 545 करोड रुपये देय आहेत. ही थकबाकी शेतकर्यांना न दिल्याने त्यांच्यात नाराजी आहे आणि यासाठी ते राज्य सरकारला दोषी मानत आहेत. यामुळे देवीपाटण मंडलचे आयुक्त महेंद्र कुमार यांनी या तीन कारखान्यांना ‘अल्टीमेटम‘ दिला आहे. तसेच या क्षेत्रातला उस इतर कारखान्यांना पुरवला जावा, असा प्रस्तावही कुमार यांनी शासनाला पाठवला आहे.
यामधील चिलवरिया साखर कारखान्याने केवळ 18 टक्के थकबाकी दिली आहे. ईटाईमैदा आणि कुन्दरखी कारखान्यांनी अनुक्रमे 54 आणि 49 टक्केच थकबाकी भागवली आहे. ऊस आयुक्त यांनी सांगितले की, मंडलद्वारा ऊस शेतकर्यांचे 545 करोड रुपये देय आहेत. त्यापैकी चारशे करोड रुपये चिलवरिया, इटाईमैदा आणि बजाज कुन्दरखी या कारखान्यांकडे बाकी आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.