कोल्हापूर: कोल्हापूर ला या वर्षी महापुराने जोरदार तडका दिला आणि हादरवून टाकले या मध्ये बऱ्याच लोकांचे संसार उघड्यावरती पडले आणि शेतीचेही खूप नुकसान झाले. आता जरी पूर परिस्तिथी हाताबाहेर नसली तरी पुरग्रस्तांचे पुनर्वसन आणि आरोग्य या वरती सर्व पातळीवरती प्रयत्न चालू आहेत.
आता पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांना पुराचा फटका बसला तर या १२ तालुक्यातील तब्बल ३७५ गावे पुरबाधित होती.
या ३७५ गावातील १०२५५७ कुटुंबाना स्तलांतरित व्हावे लागले यामध्ये ४०७५३१ व्यक्तींची संख्या आहे या स्थलांतरित व्यक्तींना राहण्यासाठी १५१ तात्पुरता निवारा केंद्रांची तरतूद केली आहे.
आता पर्यंत आलेल्या अधिकृत माहिती नुसार कोल्हापुरात महापुरात १० मयत व २ जण बेपत्ता आहेत. तर गाय व वासरे मिळून २१७ आणि कोंबड्या व इतर मिळून १९७९५ पशुधना चे नुकसान झाले. याची किंमत सरासरी ८० लक्ष रुपये आहे.
पुरामुळे पडझड झालेल्या घरांच्या आकडेवारीत ७४७ घरे पूर्ण पडलेली आहेत ११७६५ घरे अंशतः पडलेली आहेत. तर ३८७ गोठयांचे नुकसान झाले आहे.
NDRF/SDRF/Teristorial Army/Navy/NGO व जिल्हा प्रशासन यांचेकडून उपलब्ध झालेल्या माहिती नुसार सध्या कोल्हापुरात ५ पथके, ९ बोटी, ८२ जवान कार्यरत आहेत.व १६९ वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
ATM बाबतची सद्यःस्थिती मध्ये एकूण ६४७ ATM पैकी २२५ ATM पुरामुळे कार्यरत नाहीत. तर बँकांचे व्यवहार चालू असून, विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावरती येत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.