पुणे : राज्यात आलेला पूर आणि ऊसाच्या घटत्या प्रमाणामुळे ऑगस्टमध्ये साखरेच्या किंमती प्रति क्विंटल 80 रुपायांवरुन 120 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरामुळे ऊसाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर दुष्काळी प्रदेशात ऊसाची विक्री जनावरांच्या चार्यासाठी केल्यामुळे 2019-2020 च्या हंगामासाठी राज्यात साखर कारखान्यांना ऊसाच्या घटत्या प्रमाणाशी सामना करावा लागू शकतो. या सार्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होवू शकतो. उत्पादन घटल्यामुळे साखरेच्या किमती वाढत आहेत.
उत्तर प्रदेशात साखरेचे अधिक उत्पादन असले तरी, इतर राज्यांच्या तुलनेत त्यांचा दरही जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील साखरेच्या किमती वाढत आहेत. श्रावणातील सणासुदीच्या दिवसामुळे साखरेची मागणी वाढत आहे.
2019-2020 या हंगामात राज्यात साखरेचे उत्पादन जवळपास 70 ते 75 लाख टन होईल अशी आशा होती, पण पूरामुळे या उत्पादनात 12 ते 15 टक्के घट होवू शकते. ऊसाच्या अनुपलब्धीमुळे गाळप हंगामाचा अवधी 160 दिवसांवरुन कमी होवून 130 दिवस असू शकतो. काही महिन्यांपासून काही कारणांमुळे साखर कारखाने अर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, पण आता घरगुती साखरेच्या वाढलेल्या किमती त्यांना दिलासा देतील.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.