पुढील वर्षी यूएई मध्ये लागू होणार साखर कर

दुबई : अबूधाबी, दुबई, शारजाह, अजमान, उम-अल-क्वैन, रास अल खैमा, फुजैराह अशी 7 राज्य मिळून बनलेल्या यूएई मध्ये पुढील वर्षापासून साखर कर लागू होणार आहे. जगभरातील अनेक देशांनी गेल्या काही वर्षांमध्ये साखरपेयांवर कर लावला आहे, आता यूएई सुद्धा त्यांच्या पावलावर पाउल ठेवत साखर कर लागू करणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र मानले गेलेल्या यूएइ ला अतिप्रगत राष्ट्रांच्या पंगतीत मानाचे स्थान आहे. इथल्या सरकारने साखर आणि गोड पेयांवर कराची घोषणा केली आहे. अहवालानुसार, पुढच्या वर्षीच्या 1 जानेवारीपासून, तरल, केंद्रीत, पाउडर, अर्क किंवा कुठल्याही साखर पेयावर 50 टक्के कर लागू होईल.

साखरेवर कर लागू केल्यामुळे कदाचित या देशात साखरेच्या वापरावर परिणाम होवू शकतो. ग्राहकांना साखर पेयासाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. साखरेची विक्री कमी करणे आणि अधिकाधिक निरोगी आयुष्य बनवण्यावर देशाने लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडेच, थायलंडने साखर कर पुन्हा दुसर्‍यांदा वाढवला होता, जो 1 ऑक्टोबर पासून प्रभावी होणार आहे. शिवाय 1 ऑक्टोबर 2021 साठी साखर करामध्ये तिसरी वृद्धी होणार आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

साखरेवर असणारा कर केवळ यूएइ मध्येच लागू झालेला नाही, तर युनायटेड किंगडम, थाइलंड, फ्रान्स, आयर्लंड, सौदी अरब, पोर्तुगाल आणि काही अमेरीकेतील राज्यांनीही गेल्या काही वर्षांमध्ये लागू केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here