लखनौ : बिसवा येथील भाजपचे आम. महेंद्र सिंह आणि त्यांच्या सहकार्यां विरोधात सितापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचे सचिव राम प्रताप आणि सभासद यांच्यावर हल्ला करुन त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप आहे. बिसवा मध्ये सहकारी समितीच्या सदस्यांनी सीतापूर कलेक्ट्रेट वर आमदारा विरोधात मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी महेंद्र सिंह आणि त्यांच्या सहकार्यां विरोधात एफआयआर दाखल केली.
साखर कारखान्याचे सहकारी समितीचे सचिव राम प्रताप यांनी पोलिसांना सांगितले की, बिसवा आमदार महेंद्र सिंह यांचे सहकारी नागेंद्र यांनी बुधवारी त्यांना फोन केला आणि रात्रीची ड्यूटी आशिष यादव यांना द्या असे सांगितले. यावर राम प्रताप म्हणाले, मी आता एका कामात व्यस्त आहे, त्यामुळे याबाबत आपण नंतर बोलू असे मी सांगितले, पण तरीही नागेंद्र यांनी मला अर्ध्या तासाच्या आत आमदारांच्या कार्यालयात येवून त्यांना भेटायला सांगितले. दुपारी 2.30 वाजता, नागेंद्र 20 माणसांबरोबर कार्यालयात आले. माझी कॉलर धरुन मला फरफटत बाहेर आणले. कार्यालयातील इतर लोकांनाही भरपूर मारहाण केली. त्यानंतर नागेंद्र मला महेंद्र सिंह यांच्याकडे घेवून गेला. मला पहताच त्यांनी माझ्या थोबाडीत मारली आणि खूप शिव्या दिल्या. त्यांच्या माणसांनीही मला मारहाण केली. या सगळ्यातून मी कसातरी पळून जाण्यात यशस्वी झालो. कसातरी जिव वाचवून लखनौच्या दिशेने जाणार्या एका बसमध्ये चढलो. ह्या घटनेचे संपूर्ण कव्हरेज समिती कार्यालयात असणार्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद आहे.
सीतापुरचे एसीपी, एल आर कुमार यांनी सांगितले की, बिसवा आमदार महेंद्र सिंह, त्यांचे सहकारी नागेंद्र आणि 20 अज्ञात लोकांविरोधात मारहाण, शिव्या आणि धमकी देण्याच्या आरोपात एफआयआर दाखल केली आहे. सीसीटीवी पाहून पुढील कारवाईदेखील लवकरच करु. पण भाजपच्या महेंद्र सिंह यांनी आपल्यावरील सर्व आरोपांना फेटाळून लावले. शिवाय राम प्रताप भ्रष्टाचारी होता. त्याने केलेल्या भ्रष्टाचारविरोधात तपासही सुरु असल्याचे सांगितले. तसेच, मला कुणीतरी यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि सीसीटीवी च्या फुटेजमध्येही आपण नसल्याचे महेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.