नवी दिल्ली : भारतात अनेक क्षेत्रातील उद्योग मंदीच्या सावटाखाली आहेत. त्यातही ऑटो उद्योगाला मंदीची सर्वाधिक झळ बसली आहे. मारुती सुजुकि इंडिया लिमिटेड कंपनीतील अस्थायी कर्मचाऱ्यांना मंदीचा चटका सहन करावा लागला आहे, कारण या कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केले गेले नाही. यापूर्वी पारले जी मधील तब्बल १o हजार लोकांवर मंदीमुळे जॉब लेस होण्याची वेळ आली आहे. मंदीतून सावरण्यासाठ ब्रिटानिया बिस्कीट ने आपल्या वस्तूंची किंमत किंमत वाढवली.
ऑटो उद्योगासाठी हे वर्ष खूपच कठीण गेले. मागणीतही मोठया प्रमाणात घट झाल्यामुळे या उद्योगावर मंदीचा थेट परिणाम दिसून आला. भारतातील अर्थिक वृद्धितील मंदीमुळे पहिल्यापासूनच ऑटो उद्योगात लाखो कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे.
मारुति सुजुकी इंडिया लिमिटेड चे चेयरमैन आरसी भार्गव म्हणाले, उद्योगाला असणारी कमी मागणी आणि इन्वेट्री शी सुरु असणारा संघर्ष यामुळे, कंपनीने ३००० अस्थायी कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केले नाही.
ऑटो सेक्टर बरोबरच पारले जी कंपनीही मंदीच्या सावटाखाली असून, जर प्रॉडक्ट ना खप नसेल तर तब्बल १० हजारापेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करावे लागेल असे कंपनी कैटेगरी हेड मयंक शहा यांनी सांगितले होते. तसेच १०० रुपये प्रति किलो किंवा त्यापेक्षा कमी किंमत असणाऱ्या बिस्कीटांवरची जीएसटी कमी करण्याची मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.