काही आठवड्यान पूर्वीच रु.२९००प्रती क्विंटल दरात विकली जाणारी साखर, आज ३४०० रुपये प्रती क्विंटल पर्येंत मजल मारून सर्व सामान्य ग्राहकांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे.
साखरेच्या चढ्या दरामुळे ग्रहिणेचे बजेट कोलमडत आहे. या हंगामात साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि घसरलेल्या दरामुळे साखर उद्योग संकटात सापडले आहे. या परिस्थितीतून
साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी या पूर्वी केंद्र सरकारने अनेक उपाय केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारने साखर उद्योगासाठी ८५०० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला सावरण्याची संधी प्राप्त झाली आणि साखरेचे भाव वाढत आहेत.
आता साखरेच्या भावात ४०० ते ५००रु. प्रती क्विंटल वाढ होवून साखर ३४०० रुपय दराने बाजारत विकली जात आहे. केंद्र सरकारचे पॅकेज आणि साखरेचे वाढते दर यामुळे साखर
उद्योगाला फायदा होत आहे. परंतु साखरेचे भाव वाढल्याने सामन्य ग्राहकाच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.