साखर उद्योग असंख्य अर्थिक समस्यांशी झगडत आहे, या संकटातून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी सरकार हरप्रकारे प्रयत्न करत आहे. मंगळवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट ने इथेनॉल च्या किंमती वाढवण्यासाठी मंजूरी देऊन साखर उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. ऊस शेतकरी आणि साखर कारखान्यांना फायदा होण्याच्या हेतूने सरकारने इथेनॉलच्या किंमतीत वाढ केली आहे.
बी – हेवी मोलॅसिस वाल्या इथेनॉलची किंमत ५२ .४३ रुपये प्रति लिटर हून वाढवून ५४ .२७ रूपये प्रति लिटर केली आहे. तर सी – हेवी मोलॅसिस वाल्या इथेनॉलची किंमत ४३ .४६ रुपये प्रति लिटर हून ४३ .७५ रुपये लिटर अशी वाढवली आहे. थेट ऊसाच्या रसापासून बनणाऱ्या इथेनॉलच्या किमती देखील २९ पैशाने वाढल्या असून याचा दर ५९ .४८ रुपये प्रति लिटर असा निश्चित झाला आहे. याशिवाय जीएसटी आणि परिवहन शुल्क देखील लागू हाईल. तेल कंपन्यांना परिवहन शुल्क निश्चित करण्यास सुचवले आहे.
कच्च्या तेलावरील आयातीवरचे अवलंबन कमी करण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉलच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल. इथेनॉल उत्पादनामुळे साखरेचा अतिरिक्त साठा कमी होण्यास मदत होईल. २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिसळण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे.
साखर परिषद २o-२० च्या दरम्यान गडकरी म्हणाले होते, येणाऱ्या दोन वर्षात इथेनॉल चा बाजार ५०, ००० करोड रुपयांपर्यंत वाढेल आणि २ लाख करोड रुपयांपर्यंत वाढण्याची क्षमता आहे. साखर कारखाने साखरेच्या किंमतीतील घट, अतिरिक्त साठा आणि ऊस थकबाकी अशा अडचणींशी सामना करत आहेत. इथेनॉलच्या उत्पादनामुळे कारखान्यांच्या अर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि ऊस थकबाकी भागवण्यासाठी ही मदत होईल, असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
नुकतीच, सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान आणि बफर स्टॉक ला मंजूरी दिली होती, ज्याचा साखर कारखाने आणि ऊस शेेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.