‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार – ०४ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज मार्केट मध्ये मागणी मिश्रित दिसली. महाराष्ट्रात, पावसाच्या तडाख्याने मार्केट मध्ये शांत होते. कारखान्यांचे भाव ३२७० ते ३३७० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३२३० ते ३३२० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३२० ते ३४६० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३४१० ते ३४५० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३३१० ते ३४१० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३४४० ते ३५४५ रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर होता. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३०६.६० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.२२ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३५ ते ३४० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४८ ते ३५३ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०८०० ते २१००० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१७०० ते २२००० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७२.०३ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.१ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९५७ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५४.८४ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स १६१ अंकांनी वर येऊन ३६७२४ अंकांवर तर एनएसई निफ्टी ४६अंकांनी खाली येऊन १०८४४ वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here