मेरठ : बिजनौर येथे ऊस थकबाकी न भागवलेल्या साखर कारखान्यांचे मालक आणि अधिकाऱ्यांविरोधात सरकारने कडक भूमिका घेतली आहे. डीएम म्हणाले, साखर कारखानदार आणि अधिकाऱ्यांना याबाबत नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ऊस थकबाकी बरोबर व्याजही देणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. व्याज देण्यासाठी नोटीस काढणे, हे पहिल्यांदाच झाले आहे. ९ सप्टेंबर पर्यंत यावर उत्तर दिले नाही तर, कारखानदार आणि अधिकाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
जिल्हयातील बिजनौर, चांदपुर, धामपुर, बिलाई, नजीबाबाद, सोहारा आणि बरकातपुर मध्येही शेतकऱ्यांचे करोडो रुपये देय आहेत. या थकबाकीसाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेने प्रलंबित असणाऱ्या थकबाकी वर व्याज देण्याच्या मुुद्दयाला हात घातला आहे. यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयाने कारखान्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करत असल्याचे पत्र जिल्ह्याच्या सहायक साखर आयुुक्तांना लिहिले आहे.
कारखान्याच्या मालकांना आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की, सतत निर्देश देऊनही कारखान्यांनी थकबाकी भागवलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्यात असंतोष आहे. उत्तर प्रदेश ऊस नियम १९५४ च्या ४५ व नियम ४८ क आणि अधिनियम १९५३ अंतर्गत १७ चे उल्लंघन कारखान्यांद्वारे केले आहे. आणि हा अधिनियम २२ च्या अंतर्गत दंडनीय अपराध आहे. नोटीस मध्ये असेही म्हटले आहे की, त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करून त्यांचा जामीन जप्त केला जावा.
ही नोटीस डीएम कार्यालयाकडून धामपुर शुगर मिल्स लिमिटेडच्या संदीप कुमार, पीसीबी फूड्स शुगर प्राइवेट लिमिटेड चे चांदपुर कारखान्याचे संचालक रमणदीप सिंह सेठी, अनिल कुमार, अवध शुगर एंड एनर्जी लिमिटेड च्या स्योहारा साखर कारखान्याचे संचालक देवेंद्र कुमार शर्मा, बलवंत सिंह, बजाज हिंदुस्थान शुगर मिल्स लिमिटेड च्या बिलाई कारखान्याचे अजय कुमार शर्मा, संचालक अशोक कुमार, ग्रुप चे मैनेजिंग डायरेक्टर व चेअरमन कुशाग्र बजाज, उत्तम शुगर मिल्स लिमिटेड च्या बरकातपुर कारखान्याचे अशोक कुमार अग्रवाल व ग्रुप चे मैनेजिंग डायरेक्टर राजकुमार अदलाखा, वेव इंडस्ट्रीज प्राइवेट लिमिटेड च्या बिजनौर कारखान्याचे पूर्णकालिक निदेशक देवेंद्र सिंह बिंद्रा यांच्या विरोधात जारी करण्यात आली आहे.
साखर कारखान्यांवर कडक कारवाई होण्याची नोटीस गेल्यामुळे साखर कारखान्यात भूकंप झाला आहे. शुक्रवरी धामपुर कारखान्याने ९५ टक्के ऊस थकबाकी भागवली, उर्वरीत कारखाने देखील थकबाकी देण्याच्या गोष्टी बोलत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मतानुसार, साखर कारखान्यांचे मालक आणि अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. थकबाकी न देणाऱ्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.