टांझानिया मध्ये २०१८-१९ च्या हंगामात साखर उत्पादन वाढले आहे. देशात १६.८ टक्कयाने हे उत्पादन वाढले आहे, ज्यामुळे घरगुती साखरेच्या वापरासाठी मदत होईल.
संसदेत बोलताना, उप कृषि मंत्री, ओमेरी मुगुम्बा म्हणाले की, टांझानिया मध्ये साखर चे उत्पादन २०१७-१८ मध्ये ३०, ७४३१ .२६ टनाने वाढून २०१८-१९ या हंगामात ३५,९२१९.२५ टन झाले आहे.
टांझानिया देशामध्ये साखरेचा वापर कमी होण्यासाठी साखर उत्पादकांना साखर आयात करण्याची अनुमती दिल्यानंतर देशात साखर उत्पादन वाढले आहे. सुरुवातीला, व्यापारी आयात करत होते..
देशात ऊसाचे उत्पादन सुध्दा वाढले आहे. मुगुम्बा म्हणाले, ऊसाचे उत्पादन २०१७-१८ मध्ये ५,६८,०८३ टनाने वाढून २०१८-१९ च्या हंगामात ७,०८,४६० टन झाले आहे.
टांझानियात तीन वर्षात दुपटीपेक्षाही अधिक साखर उत्पादनाची योजना आहे, ज्यासाठी सरकार हर एक प्रयत्न करत आहे.