कराची : पाकिस्तानच्या बड्या शहरांमध्ये दुधाची किंमत नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. कराची आणि सिंध प्रांतात दुधाची किंमत प्रति लिटर 140 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दुधापेक्षा कमी आहेत. दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल 113 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 91 रुपये प्रति लिटर विकत होते.
सिंधच्या काही भागात दुध प्रती लिटर 140 रुपये दराने विकले जात आहे. एका दुकानातील दुकानदाराने सांगितले की, मागणीत वाढ झाल्यामुळे कराची शहरात दुधाची किंमत 120 ते 140 रुपया दरम्यान आहे.
मोहरमच्या काळात पवित्र महिन्याच्या मिरवणुकीत सहभागी होणार्यांना दूध, रस आणि थंड पाणी देण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लावले जातात. यासाठी दुधाला मोठी मागणी आहे. ही मागणी वाढल्यामुळे दुधाचे दर वाढले आहेत.
स्टॉल लावणार्या एका रहिवाश्याने सांगितले की, त्याने आपल्या आयुष्यात कधीही इतकी महागाई वाढलेली पाहिलेली नाही.
दुधाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले कराचीचे आयुक्त इफ्तिखार शलवानी यांनी अत्यल्प दराबाबत काही केले नसल्याचे दिसते. गंमत म्हणजे आयुक्त कार्यालयाने ठरवलेल्या दुधाची अधिकृत किंमत 94 रुपये प्रतिलिटर आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.