गुरुवार – १२ सप्टेंबर २०१९
डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेचा बाजार स्थिर राहिला, तसेच कोणतीही हालचाल दिसून आली नाही.
महाराष्ट्रात काही ठिकाणी मार्केट अनंत चतुर्दशी निमित्त बंद असल्याने येथील व्यापार शांत होता. S/30 साखरेचा व्यापार ३१५० ते ३२३० रुपये राहिला तर M/30 चा व्यापार ३२९० ते ३३७५ रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार ३३८५ ते ३४३५ रुपये होता.
गुजरात येथील बाजार अनंत चतुर्दशी निमित्त बंद राहिला.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार ३५६० ते ३६३० रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार ३३२५ ते ३५२५ रुपये होता तर M/30 चा व्यापार ३४२५ ते ३५२५ रुपये होता.
*दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट ३१०.९० डॉलर राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट १०.७५ डॉलर वर होता. जगभरातील साखर उद्योग नुकत्याच घोषित झालेल्या MAEQ निर्यात योजनेच्या नोटिफिकेशन ची वाट पाहत असल्याने बाजारात कोणती निर्यातीसाठी ऑफर दिसून येत नाही. हि योजना घोषित होताच निर्यात करण्याची पांढऱ्या साखरेचा व्यापार सुरु होईल.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.१६४ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.०६ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९३२ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५५.२३ डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स १६६ अंकांनी खाली येऊन ३७१०४ अंकांवर तर एनएसई निफ्टी ५३ अंकांनी घसरून १०९८२ वर थांबले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.