स्थानिक लोकांच्या जोरदार मागणीमुळे ब्राझीलमधील साखर आणि इथेनॉल उद्योगातील कंपन्या अधिक इथेनॉल तयार करण्याची क्षमता वाढवण्याच्या मार्गावर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किंमती घसरल्यामुळे इथेनॉल उत्पादनावर भर देण्यात येणार आहे.
ब्राझीलमधील बर्याच कंपन्यां पुढील वर्षी अधिक इथेनॉल तयार करण्यासाठी आपल्या साइटमध्ये नवीन डिस्टलरी बांधत आहेत, असे अहवालात नमूद केले आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे किंमती कमी राहिल्या आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन करण्यास सुरुवात केली. कारखाने इथेनॉलला असणार्या मोठ्या प्रमाणातील मागणीमुळे इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाची जादा मागणी करेल, अशी आपेक्षा आहे. साखर कारखान्यांकडून साखरेसाठी कमी ऊस मिळण्याची शक्यता असल्याने, ब्राझीलमध्ये साखरेच्या अपेक्षित उत्पादनातही घट होण्याची शक्यता आहे.
ऊसाच्या रसाबरोबरच कॉर्नमधूनही इथेनॉल तयार करण्याचे ध्येय ब्राझीलने बाळगले आहे. साओ मार्टिन्हो एसए, देशातील सर्वात मोठा साखर आणि इथेनॉल उत्पादकांपैकी एक आहे, तर गोयस राज्यात कॉर्नपासून इथेनॉल तयार करण्यासाठी कशा प्रकारे सोयी केल्या जातील यादृष्टीने प्रयत्नशील आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.