नायजेरियामध्ये २०२३ पर्यंत वार्षिक साखर उत्पादन ६००,००० ते ७५०,००० मेट्रिक टन होण्याची आशा

नायजेरिया सातत्याने साखरेचा मास्टर प्लान करण्याच्या प्रयत्नात असल्याने नायजेरियामध्ये २०२३ पर्यंत वार्षिक साखर उत्पादन ६००,००० ते ७५०,००० मेट्रिक टन होण्याची आशा आहे, असे डायरेक्टर, पॉलिसी प्लानिंग, रिसर्च एंड स्टैटिस्टिक्स, नॅशनल शुगर डेवलपमेंट काउंसिल (NSDC), कोलावोल हिजकियाह यांनी सांगितले.

नायजेरिया साखरेसाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे आणि म्हणूनच साखर आयातीवरची निर्भरता कमी करण्याची देशाची इच्छा आहे. यामुळे देशाचा घरगुती साखर उत्पादनावर अधिक जोर आहे, जेणेकरून इतर देशांची मदत घ्यावी लागू नये.

नॅशनल शुगर डेवलपमेंट कौंसिल (NSDC) के एग्जीक्यूटिव सेक्रेटरी, लतीफ़ बुसारी यांच्या मतानुसार, साखर आयाती मधील कमी प्रमाण आणि घरगुती उत्पादनातील वाढ यामुळे ५६ दशलक्ष डॉलरची बचत होईल. सरकार घरगुती साखर उत्पादन वाढवण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. बुसारी म्हणाले होते की, देशात साखर उद्योग वाढवण्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य केले जाईल. देशात साखर उद्योगातील दिग्गजांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here