मुंबई /पुणे : नुकत्याच आलेल्या महापुरामुळे सांगली, कोल्हापूर या साखरपट्ट्यातील ऊस पाण्याखाली गेला. ऊसाच्या झालेल्या नुकसानीमुळे यंदा साखर हंगाम लवकर सुरु होईल, असा अंदाज होता. पण विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साखर हंगाम दिवाळीनंतरच सुरु होईल अशी चिन्हे दिसत आहेत. राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी विधानसभा निवडणूकीच्या तयारीत आहेत, ही स्थिती पाहता साखर हंगाम विधानसभा निवडणूकांनंतच सुरु होईल.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस पीक तर पूर्ण नष्ट झाले आहे. ज्या शेतकर्यांची शेती पाण्याखाली होती, त्यांनी साखर हंगाम लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी केली होती, जेणेकरुन शेतीत उभ्या असणार्या ऊसातून काहीतरी रक्कम हाती लागेल. पण आता साखर हंगाम उशिरा सुरु होणार असल्यामुळे पूरग्रस्त ऊस पीकांमुळे शेतकर्यांना काही फायदा होईल अशी चिन्हे दिसत नाहीत.
पश्चिम महाराष्ट्रात अधिकांश साखर कारखाने कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय नेत्याचेेच आहेत आणि आता हे सगळे नेते निवडणूकीत व्यस्त आहेत. साखर कारखान्यांच्या प्रबंधनाबरोबर श्रमीकही कारखान्याच्या अध्यक्षाच्या निवडणूकीत भाग घेत आहेत. याचाच अर्थ, आता राजनेता निवडणूक आटोपल्यावरच साखर हंगाम सुरु करण्याचा विचार करत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.