13 व्या दिवशीही शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन सुरुच

लक्सर : लक्सर कारखाना प्रबंधनाकडून रिजेक्ट करण्यात आलेल्या प्रजातींचे देय कारखान्याकडून बाकी आहे. ते पैसे लवकरात लवकर शेतकर्‍यांना मिळावेत यासाठी शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. आज 13 व्या दिवशीही या मागणीसाठी शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन सुरुच आहे.

साखर कारखान्यांकडून रिजेक्ट करण्यात आलेल्या ऊसाच्या दोन प्रजातींची थकबाकी कारखान्याने द्यावी, या मागणीसाठी भारतीय शेतकरी संघाने धरणे आंदोलन केले आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.

शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष कुशलपाल सिंह म्हणाले, प्रशासन आणि ऊस विभाग साखर कारखाना प्रबंधनाच्या दबावामुळे कुणीच कारवाई करत नाही. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. यावेळी कुशलपाल सिंह, नेक्षाल सिंह, संदीप, बृजभूषण, गोरख सिंह, रामकिशन, बचन सिंह, सुशील कुमार, विनोद कुमार, विरेंद्र, आजाद, सुधीर कुमार, रतिराम, चरण सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here