नवी दिल्ली: भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगाम घालण्याच्या आपल्या वचनाला जागून, केंद्रातील मोदी सरकारने भ्रष्टाचार, सीबीआय प्रकरणे आणि इतर आरोपांमुळे आता १५ वरिष्ठ आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टेक्सेस (CBDT) यांनी सीआईटी, जेसीआईटी, एडिश्नल सीआईटी, एसीआईटी पदावर कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियम ५६ ( जे ) अंतर्गत सक्तीची निवृत्ती दिली आहे. निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार आणि सीबीआय सह अनेक तक्रारी दाखल होत्या.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनानुसार केली गेली, ज्यामधे पीएम मोदी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हणाले होते की, आपल्या पदाचा गैरवापर उठवणाऱ्या आणि कर भरणाऱ्या लोकांना त्रास देणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
यापूर्वी सीबीडीटी च्या १२ अधिकाऱ्यांसह ४९ उच्च पदांवर कार्यरत कर अधिकाऱ्यांनाही नियम ५६ ( जे ) अंतर्गत वर्षाच्या सुरुवाातीलाच सेवानिवृत्त केले होते. यामध्ये अधिकांश अधिकाऱ्यां विरोधात भ्रष्टाचााराची प्रकरणे होती, ज्यामध्ये, करोडों च्या रकमेची अफरातफर केली होती. या यादीमध्ये देशभरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका अधिकाऱ्याला १५,००० रुपयांची लाच घेताना पकडले होते.
जूनमध्ये ही सरकारने भ्रष्टााचाराच्य आरोपांवर सीबीआय च्या १५ आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त केले होते. यांच्यावर लाच, तस्करी आणि कट कारस्थान करण्याचा आरोप होता. यापूर्वी १२ आयआरएस अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यास सांगितले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.