गोंडा: सायबर गुन्हेगारीच्या टोळीने विदेशी मुद्रेच्या नावावर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्याला लाखों रुपयांना फसवले. या विरोधात अधिकाऱ्याने केलेल्या लेखी तक्रारीवर पोलिसांनी सात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दतैली साखर कारखाना परिसरात तैनात सिनीयर डिवीजन चीफ कृष्णपाल यांनी पोलीसात लेखी तक्रार दिली. यामध्ये असे सांगितले आहे की, गेल्या १७ ऑगस्टला भारत मैट्रिमोनी वर अनिता सान्जिथ नावाच्या महिलेशी संपर्क झाला आणि २५ ऑगस्टला एक पार्सल पाठवण्यात आले. ही माहिती त्यांच्या ई – मेल, एसएमएस आणि फोनवर दिली गेली. मुंबईतील कुरियर एजंट द्वारा पार्सलमध्ये विदेशी मुद्रा असल्याचे सांगून कस्टम शुल्काच्या नावावर भारतीय स्टेट बँक दतौली शाखेतून 8 लाख 89 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. पीडिताला एक महिन्यानंतर काहीच मिळाले नाही, त्यामुळे आपण फसवलो गेलो असल्याची जाणिव झाली. पोलिसांनी विविध आधारांवर हे प्रकरण नोंदवल आहे. प्रभारी निरिक्षक प्रमोद कुमार सिंह यांनी सांगितले की, अधिक तपास सुरु आहे.