दोन साखर कारखान्यांकडे अधिक प्रमाणात जळालेला ऊस आल्यामुळे त्याचा साखर उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. ही स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने कारखान्याचे कर्मचारी काम करत असल्याचे फिजी शुगर कॉर्पोरेशनने सांगितले आहे.
आतापर्यंतच्या गळीत हंगामात लोटोका साखर कारखान्याला 74 टक्के, रारावाईला 75 टक्के आणि लबासाला 34 टक्के ऊस मिळाला आहे.
एफएससी च्या मतानुसार, जळालेल्या ऊसाचा ऊसाच्या दर्जावर आणि साखरेच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही, तर जळालेला ऊस तर्यावरणसाठी आणि विशेषत: मातीच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. कारण आगीमुळे अनेक कीटक व जीव नष्ट होतात.
दरम्यान, या महिन्याच्या 23 तारखेपर्यंत या तिन्ही साखर कारखान्यांनी एकूण 1,012,234 टन ऊस गाळप केले असून, त्यापासून 98,852 टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.