कुकदूर (रायपूर) : छत्तीसगड येथील कुकदूर परिसरातील भेलकी गावात रेशनच्या दुकानात चोरी झाली आहे. याठिकाणी असलेली साखरेची चोरी झाली आहे. तब्बल 2.74 क्विंटल साखर चोरुन नेली आहे. हे चोर अज्ञात असून, रेशन दुकानातील खिडकीवर असणारी जाळी तोडून ही चोरी केली आहे. दुकानात जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील वाटप न झालेला माल होता.
कुकदुर पोलिसांनी या अज्ञातांविरोधात 380, 457 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चोरांचा तपास चालू आहे. साखरेबरोेबरच चोरांनी तांदूळ आणि मीठाचीही चोरी केली आहे. राज्यात साखर चोरीचे हे पहिलेच प्रकरण नाही, यापूर्वी देखील साखर चोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी अंबिकापूर मध्ये साखर चोरीचे प्रकरण समोर आले होते. सरकारमान्य रेशन दुकानाचे कुलूप तोडून रेशनचा माल चोरल्याची नोंद ओडगी ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अलीकडेच, औरंगाबादमध्ये ट्रकमधून साखरेची चोरी करणार्या टोळीला सीआयडीसीओ क्राइम रिकवरी टीमने दोन तासातच ताब्यात घेतले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.