मोठा खुलासा : आरबीआय ने बंद केली 2000 च्यानोटांची छपाई

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. आयबीआयच्या म्हणण्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड यांनी सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये दोन हजाराची एकही नोट छापलेली नाही. अहवालानुसार, आरबीआय ने आरटीआय ला उत्तर देताना सांगितले की, 2016-17 च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या 3,542.991 दशलक्ष नोटा छापल्या गेल्या होत्या, पुढच्या वर्षी या 111.507 दशलक्ष इतके नोटांचे प्रमाण कमी झाले आहे.

2018-19 मध्ये बँकेने 46.690 दशलक्ष नोटा छापल्या आणि 2019-20 या आर्थिक वर्षात एकही दोन हजाराची नोट छापलेली नाही.  गेल्या सोमवारी झालेल्या एनआईए च्या बैठकीत 2000 रुपयाच्या नकली नोटांबाबत चर्चा झाली. महत्वाची बाब म्हणजे, एनआयए ही एक नकली नोटांसंदर्भातील नोडल तपास एजन्सी आहे.  या वर्षात 2000 ची एकही नोट छापली गेलेली नाही. काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 2016 मध्ये बंद करण्यात आल्या होत्या. यानंतर एका मोठ्या चलनाच्या रुपात 2000 रुपयाची नोट बाजारात आणली गेली होती.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here