कुआलालंपुर: भारताकडून कच्च्या साखरेची आयात वाढवणार असल्याचे, अलीकडेच मलेशियाने सांगितले. पण भारत मलेशियातून होणार्या पाम तेलाची आयात थांबवण्याचा विचार करत आहे. ही बाब महत्वाची आहे की, इंडोनेशिया नंतर मलेशिया जगातील दुसर्या नंबरचा सगळ्यात मोठा पाम तेल उत्पादक आणि निर्यातक देश आहे. तसेच मलेशिया च्या उत्पादनात खाद्य तेलाचे योगदान गेल्या वर्षी 2.8 टक्के होते.
पाम तेलाचे प्रभारी मलेशियाई मंत्री टेरेसा कोक यांनी सांगितले की, भारत 2018 मध्ये आमच्या पाम तेल आणि या तेलावर आधारित उत्पादनांचा तिसरा सर्वात मोठा आयातक देश होता, त्यामुळे आम्ही हे पाउल उचलले आहे. आम्ही भारतात 6.84 बिलियन रिगिट इतके पाम तेल आणि त्यावर आधारित उत्पादनांची निर्यात केली आहे. आज भारत जगातील अनेक साखर उत्पादक देशांपैकी एक सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे.
काश्मीर मुद्द्यावर मलेशियाच्या टिपणीमुळे भारताने आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि मलेशियातून पाम तेलाच्या आयातीवर निर्बंध घालण्याच्या विचारात आहे. यामुळे मलेशियात चिंताग्रस्त आहे. कोक म्हणाले, ते मलेशिया आणि भारतामधील चांगल्या संबंधांना बाधा आणणार्या मुद्द्यांबाबत जाणून आहेत. तसेच याबाबत भारताशी चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.