कोल्हापूर, ता. 17 : उसाला चांगला दर मिळण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण लवकरच आणले जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिले. सातारा येथे लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ऊसाला चांगला दर मिळावा ही या सरकारची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने साठ लाख मेट्रिक टन साखरेवर 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. येवढचे नाही तर दिलेली आर्थिक मदत ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे. साखरे सोबत इथेनॉल उत्पादनावर भर दिला जात आहे. देशातील आधुनिक कारखाने तयार केले जात आहेत. पेट्रोल-डिझेलमध्ये 10 टक्के इथेनॉलचा वापर केला जाणार आहे. ज्यावेळी इथेनॉलची मागणी वाढेल त्यावेळी ऊस उत्पादकांनाही याचा चांगला फायदा होणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.