मेरठ: शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यास प्रदेश सरकारने प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना ऊसाचे संपूर्ण पैसे दिले जातील. जे साखर कारखाने पैसे देण्यात विलंब करतील त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असे डीएम अनिल ढींगरा यांनी सांगितले. येथील विकास भवनमधील सभागृहात शेतकरी दिवसाच्या निमित्ताने ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
ते म्हणाले, दिवाळीपूर्वी मवाना साखर कारखान्याने ३० करोड रुपये आणि किनौनी कारखान्याने ४० करोड रुपये भागवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची कोणतीही समस्या सोडवली जाईल असे आश्वासन शेतकरी प्रतिनिधींना त्यांनी दिले. भारतीय किसान यूनियन चे अध्यक्ष राकेश टिकैत म्हणाले की, आमची युनियन शेतकऱ्यांना ३o टक्के जमिनीवरील ऊसाचे पीक सोडून इतर पीकांच्या लागवडीसाठी प्रेरीत करेल. ते म्हणाले, शेतकरी दिवस असूनही शेतकऱ्यांची संख्या कमी दिसत आहे, यामुळे मुद्दे कमी असल्याचा संकेत जाऊ शकतो. प्रत्येक शेताला पाणी मिळाले पाहिजे, तसेच चकरोड आणि सरकारी नाल्यांवर औषध फवारणी करू नये, अशी मागणी या बैठकीत टिकेत यांनी केली. टिकेत म्हणाले, वजनाच्या कमी जास्त प्रमाणाच्या समस्येला कमी करण्यासाठी साखर कारखान्यांना वजन काट्याचे वाटप करण्याचा प्रयत्न केला जाईल.
सकौती आणि दौराला साखर कारखान्यांनी देणी भागवली आहेत. जिल्हा ऊस अधिकारी दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, मवाना कारखान्याने ७३ टक्के, किनौनी ने ६५, नंगलामल ने ८८, सकौती ने १०० टक्के, मोहिउद्दीनपूर ने ८० आणि दौराला ने १०० टक्के पैसे भाागवले आहेत. ते म्हणाले, मवाना, दौराला, मोहिउद्दीनपुर, नंगलामल कारखान्यांचा इंडेंट 30 ऑक्टोबर ला होईल. हे साखर कारखाने ४ नोव्हेंबर पासून गाळपाला सुरुवात करणार आहे. किनौनी कारखान्याचा इंंडेंट २५ ऑक्टोबरला सुरु होणार आहे व गाळप हंगामास ३१ ऑक्टोबर पासून सुरुवात होईल. तर सकौती कारखान्याचा इंडेंट 31 ऑक्टोबरला होईल आणि गाळप हंगामास ५ नोव्हेंबर पासून सुरु होईल.
यावेळी उप कृषि निर्देशक ब्रिजेश चंद्र, जिल्हा कृषि अधिकारी प्रमोद सिरोही, एआर कॉपरेटिव हरेंद्र सिंह, गजेंद्र सिंह, राजकुमार करनावल, राजकुमार बाफर, वीरपाल, सूरजपाल, वीरेंद्र, महिपाल सिंह आदि उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.