भवानीनगर :श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-2019 मध्ये कार्यक्षेत्रातील सभासदांचे 6.80 लाख मे. टन व गेटकेन ऊस पुरवठा धारकांचे 2.16 लाख मे. टन असे एकूण 8.96 लाख मे. टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याकडून शेतकरी सभासदांसह कामगारांनाही भरीव बोनस देण्यात आला असून यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारखान्याकडून नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येत असल्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.
कारखान्याने यापूर्वी रुपये 2,500/- प्रति मे. टनाप्रमाणे रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांना अदा केली असून संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दिवाळी सणासाठी प्रति मे. टन रुपये 100/- प्रमाणे होणार्या रक्कमेतून भागविकास निधी रुपये 10/- प्रति मे. टन प्रमाणे कपात करून उर्वरित रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांच्या खात्यामध्ये वर्ग केली आहे.
शिवाय कारखान्याकडून पूर्व हंगामी ठेव रक्कम रुपये 1.27 लाख व त्यावरील व्याजही शेतकरी सभासदांच्या खाती वर्ग करण्यात आले असल्याचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले. तर, कामगारांना 2018-2019 करीता यापूर्वी मकरसंक्रांतीच्या सणावेळी 5 टक्के प्रमाणे रक्कम आदा करण्यात आली असून दिवाळीसाठी 10 टक्केप्रमाणे बोनस, सानुग्रह अनुदान अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संचालक मंडळाने सांगितले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.