मालदोवा : मालदोवा साखरेच्या विक्रीत घट झाल्यामुळे आपल्या दोन कारखान्यापैकी एक, फलेस्टी कारखान्यातील काम एप्रिल 2021 पर्यंत थांबवले असल्याचे साखर फर्म सुदजुकर यांनी सांगितले. साखरेच्या तस्करीमुळे साखर विक्रीत हजारो टनाची घट झाली आहे. अनेक उपाय करुनही, 2018 मध्ये सुदजुकर मालदोवा चे € 5mn पेक्षाही अधिक नुकसान झाले आहे आणि यावर्षी देखील ही घट वाढण्याची शक्यता आहे. यापुढे कंपनी आपल्या उत्पादन मूल्य कमी असणाऱ्या ड्रोचिया मध्ये स्थित असलेल्या कारखान्यांमध्ये आपल्या उत्पादनावर मालदोवा लक्ष केंद्रित करेल.
सुदजुकर मालदोवा प्रबंधनाने सांगितले आहे की, फलेस्टी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना या क्षेत्रातील अन्य कंपन्यांमधून नोकरीचे प्रस्ताव आलेले आहेत. जर्मन कंपनी ड्रेक्सलमेयर यांनी कारखान्यातील 80 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी आणि रोजचा वाहतुकीचा खर्च देण्याचा प्रस्ताव दिला आहे. फेलेस्टी मध्ये कपडे उत्पादन करणारी इतालवी कंपनी मार्टटेक्स्ट यांनी देखील या कर्मचाऱ्यांना नोकरीचा प्रस्ताव दिला आहे.
सुदजुकर मालदोवा चे निदेशक मंडळाचे अध्यक्ष अलेक्झडर कोस यांनी सांगितले की, बाजारात स्थैर्य येण्याची आम्हाला आशा आहे आणि फलेस्टी मध्ये साखर संयंत्राला पुन्हा उपयोगात आणले जाईल. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे आम्ही काहीही नुकसान होऊ देणार नाही. मालदोवन -जर्मन कंपनी सुदजुकर मालेदोवा गणराज्य मध्ये बीटाच्या उत्पादनातील मोठी कंपनी मानली जाते. सध्या या कंपनीचे देशात तीन कारखाने आहेत. यामधील ड्रेचिया आणि फलेस्टी या कारखान्यात साखर उत्पादन केले जाते. 2018 मध्ये कंपनीने जवळपास 52,000 टन साखरेचे उत्पादन केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.