मुंबई : राजाचा मुलगा आता राजा नाही बनणार, तर जो खरा हक्कदार आहे तोच राजा बनेल, असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या माळशिरसच्या राम सातपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
माळशिरस सारख्या छोट्या गावातून आमदार झालेल्या राम सातपुते यांचे वडिल विठ्ठल सातपुते साखर कारखान्यात मजूरी करत होते. बऱ्याच दिवसांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात सक्रिय असणाऱ्या सातपुते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाते.
Read more: कष्टाचं चीज झालं! ऊसतोड कामगाराचा मुलगा झाला आमदार
राम सातपुते म्हणाले, मी दोन तीन वर्षांपासून तिथे काम करत होतो. माझ्या आई वडिलांना आमदार म्हणजे काय हे देखील माहित नव्हते. पण लोक भेटायला येत आहेत, याचा अर्थ आपला मुलगा नक्कीच काहीतरी चांगल काम करत असेल असे मात्र त्यांना वाटत होते. माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून आणि मागासलेल्या समाजाातून आलेल्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री आणि आठवले साहेब यांनी जी क्षमता देण्याचे काम केले आहे, ते मी कधीच विसरु शकत नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.