नोव्हेंंबर महिन्यात 8 दिवस बंद राहणार बॅंका

नवी दिल्ली : दिवाळीची धामधूम संपल्यानंतर आता नव्या महिन्याची सुरूवात होणार आहे. १ नोव्हेंबर ला कन्नड राज्योत्सव, 8 नोव्हेंबरला वांग्ला फेस्टीवल असल्याने, तसेच दुसरा आणि चौथा शनिवार म्हणजे 9 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर दिवशी बॅंकांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. तर 12 नोव्हेंबर दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने बॅंकांचा बंद जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2019 मध्ये आठवड्याच्या मधल्या वारांमध्ये बॅंक बंद राहण्याची वेळ केवळ एकच दिवस राहणार आहे.

आजकाल ऑनलाईन पेमेंट सुविधेमुळे अनेकदा अवघ्या काही मिनिटांत व्यवहार करणे शक्य आहे. पण तुम्हांला थेट बॅंकेमध्ये जाऊनच व्यवहार करणे गरजेचे असेल तर तुम्हांला नोव्हेंबर महिन्यातील या बॅंक हॉलिडे लिस्टकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील नोव्हेंबर 2019 मधील बॅंक हॉलिडे

1 नोव्हेंबर, कन्नड राज्योत्सव

8 नोव्हेंबर, वांग्ला फेस्टिवल

9 नोव्हेंबर, दुसरा शनिवार – बॅंक बंद

10 नोव्हेंबर, रविवार आणि ईद -ए- मिलाद – बॅंक बंद

12 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती – बॅंक हॉलिडे

15 नोव्हेंबर, कनकदास जयंती

23 नोव्हेंबर, चौथा शनिवार – बॅंक बंद

24 नोव्हेंबर, रविवार – बॅंक बंद

नोव्हेंबर महिन्यात 8 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी, 9 नोव्हेंबरला तुळशी विवाहारंभ, 12 नोव्हेंबरला गुरूनानक जयंती, 14 नोव्हेंबरला बालदिन 27 नोव्हेंबरला देव दिवाळी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे बॅंक हॉलिडे सोबत सुट्ट्यांचे प्लॅनिंग करताना या दिवसांचे भान नक्की ठेवा.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here