मुंबई : देशभरातल्या सुमारे 13 लाख डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा डेटा लीक झाला आहे. एवढेच नाही तर या डेटाची ऑनलाइन विक्री होतेय. सिंगापूरमधल्या आयबी सिक्युरिटी रिसर्च टीमने डार्क वेबवर क्रेडिट आणि डेबिट कार्डांच्या एका डेटाबेसचा पर्दाफाश केला आहे. या कार्डांचा डेटा सिंगापूरमधला जोकर्स स्टॅश नावाच्या डार्कनेट मार्केट प्लेस वर विकला जातोय. हॅकर्सच्या वेबसाइटवर जी माहिती दिली गेलीय त्यात 98 टक्के माहिती भारतीयांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांबदद्ल आहे.
ही सगळी कार्ड एकाच बँकेची नाहीत. त्यामुळे हे मोठ्या स्तरावरचे रॅकेट आहे, असे म्हणता येणार नाही, असे अहवालात म्हटले आहे. 2016 मध्ये अशाच प्रकारे डेटाची चोरी झाली होती. त्यावेळी 32 लाख डेबिट कार्डांचा तपशील चोरीला गेला होता. यात येस बँक, एसबीआय यासह दुसर्या बँकांच्या क्रेडिट कार्डांचा समावेश होता. हे उघड झाल्यानंतर बँकांनी ग्राहकांना दुसरी क्रेडिट कार्ड दिली.
ही चोरी फक्त भारतीय बँकांच्या बाबतीत होते, असे नाही. यावर्षी फेब्रुवारीमध्ये 20 लाख अमेरिकी कार्डांचा डेटा चोरी झाल्याची बातमी आली होती. त्यामुळे जगभरातच डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.