कोल्हापूर, ता. 3: महापूरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात 135 ते 140 लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त होता. पण जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आल्याने ऊस कुजला आहे. अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पन्नही घटले आहे. दरम्यान एकीकडे उसाचा तुटवडा जाणवत असला तरीही दुसरीकडे नुकसान झालेल्या उसाची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसल्याने जिल्ह्यात 105 ते 107 लाख मेट्रिक टन उसाचे उत्पन्न होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यालाही महापुराचा फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या गळीत हंगामात 82 लाख 27 हजार मेट्रिक टन ऊस उत्पादन झाले. पण यावर्षी हेच उत्पादन 65 ते 67 लाख मेट्रिक टनापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र ९५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी महापुराचा फटका बसलेल्या मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्यात ते सर्वाधिक आहे. गतवर्षीच्या हंगामात ८२ लाख २७ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले होते. तर एक कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.दरम्यान शेतकरी नुकसान झालेल्या उसाच्या भरपाई ची वाट पाहत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.