आरसीईपी करार रद्द केल्याबद्दल राजू शेट्टींनी केले मोदींचे अभिनंदन

भारताने प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी कराराच्या (आरसीईपी) वाटाघाटीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याबद्दल स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. सरकारने या करारावर स्वाक्षरी करु नये अशी शेतकरी संघटनेची ठोस मागणी होती.

या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त होईल, त्यामुळे हा निर्णय घेंवू नका, अशी विनंती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. अखरे उशीरा का होईना सरकारने याबाबतचा योग्य निर्णय घेतला व करारावर स्वाक्षरी करण्याचे टाळले. त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो, अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी याबाबत ठाम भूमिका घेतलेली आहे. मूळ उद्देशोंमध्ये  कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आरसीईपी करार हा त्याचा मूळ हेतू प्रतिबिंबित करत नाही. याचे परिणाम निष्पक्ष किंवा संतुलित नाही, असे भारताकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here