पीएमसीच्या खातेधारकांना दिलासा: आता काढता येणार 50 हजार रुपये

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना मंगळवारी रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. निर्बंध घातलेल्या पीएमसी बँकेच्या खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा आयबीआयने पुन्हा एकदा वाढवली आहे. आता पीएमसी बँक खातेधारक, त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपये काढू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 40 हजार रुपयांची होती.

सप्टेंबर महिन्यात आरबीआयने पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध टाकले. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना सहा महिन्यांत फक्त एक हजार रुपये काढण्याची मर्यादा आली. त्यानंतर आरबीआयने वेळोवेळी ही मर्यादा वाढवली आहे. आता खातेधारकांना आपल्या खात्यातून 50 हजार रुपये काढता येणार आहेत. ज्या खातेधारकांनी यापूर्वी 40 हजार रुपये काढले असतील त्यांना आता केवळ 10 हजार रुपये काढता येतील.

आरबीआयने बँकेची आर्थिक स्थिती आणि बँकेची, आपल्या खातेधारकांना पैसे देण्याच्या क्षमतेचा अभ्यास केल्यानंतर पीएमसी बँक खातेधारकांना त्यांच्या बँकेतील खात्यातून 50 हजार रुपये काढण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर 8 खातेधारकांचा मृत्यू झाला असून याबाबत खातेधारकांमध्ये नाराजी आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here