संघर्ष आमच्या पाचवीला पूजलेला आहे : राजू शेट्टी

सोलापूर : संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हक्कासाठी सरकार कुणाचेही असले तरी संघर्ष सुरुच राहील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे नेते राजू यांनी व्यक्त केले. ते सोलापूरमध्ये बोलत होते. महाराष्ट्रात सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. सरकारी आकडे 70 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचे सांगत आहेत. मात्र वास्तवात 85 लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाल्याचा आंदाज आहे. राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या नुकसानीवर आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

23 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरात 18 व्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी आंदोलनाची दिशा व निर्णय घेण्यात येणार आहे. मागील वर्षी ज्या कारखान्यांनी शेतकर्‍यांना एफआरपी दिली नाही, त्या कारखान्यांना यावर्षी गाळप परवाना देवू नये, अशी मागणीही यावेळी राजू शेट्टी यांनी केली आहे.  दरम्यान, एफआरपी दिलेली नसतानाही अशा कारखान्यांना गाळपाची परवानगी दिली गेली, तर नाईलाजाने स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदा हातात घेईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here