पुन्हा होणार नोटबंदी ? जमा केल्या जात आहेत 2000 च्या नोटानवी

दिल्ली : दोन हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या जात आहेत आणि पुन्हा कोणत्याही व्यत्ययाशिवाय नोटबंदी केली जावू शकते, असे भारतीय प्रशासनातील निवृत्त वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले आहे.  तीन वर्षापूर्वीच्या नोटाबंदीच्या एक दिवस आधी म्हणजेच 7 नोंव्हेंबरला त्यांनी असे लिहून ठेवले आहे की, 2000 रुपयांच्या नोटेचा एक भाग चलनात नाही आणि वर्तमानात खरेदी विक्रीच्या रुपात तो काम करत नाही.

नरेंद्र मोदींच्या सरकारने 8 नोव्हेंबर, 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  गर्ग यांनी असे लिहून ठेवले आहे की, 2000 रुपयांच्या नोटेचा एक भाग प्रत्यक्षात चलनात नाही, त्यांना एकत्र जमा केले आहे. त्यामुळे 2000 रुपयाची नोट वर्तनमानात चलनाच्या मुद्रेत काम करत नाही. आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय नोटबंदी केली जावू शकते. या नोटा कोणत्याही रिप्लेसमेंटशिवाय बँकेत जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत सरकारकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here