बिजनौर: थकबाकी भागवण्यात वेळ झाल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक नवे संकट उभे आहे. बिजनोर जिल्ह्यातील काही भागातील ऊस पिकावर ‘रेड रॉट’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांना या रोगाच्या प्रादुर्भावापासून दिलासा देण्यासाठी साखर कारखानेही प्रयत्न करत आहेत. राज्यातील ऊस विभागाकडुन ही याबाबत अनेक उपायांवर विचार सुरु आहे. मुजफ्फरनगर मध्ये ऊसाच्या ०२३८ प्रजाती या रोगाच्या प्रभावा खाली आहेत.
बिजनोर मध्ये जवळपास सव्वा दोन लाख हेक्टर जमिन ऊस पीकाखाली आहे. जिल्ह्यात गंगा, राम गंगा, खो या पट्ट्यात ऊस पीक आहे. रेड रॉट मुळे ऊसाचे पीक सुकत आहे, यामुळे शेतकरी घाबरले आहेत. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मूळापासून ऊस लाल होऊ लागतो. या ऊसाला मधून कापले तर व्हिनेगर सारखा दुर्गध येतो. अशा प्रकारे हा रोग ऊसापासून तुटून वेगळा ही होऊ लागतो. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मतानुसार, शेतकऱ्यांनी रोग रहित ऊस कापून तो पेरावा. काही कारखान्यांमध्ये ऊसाच्या बिया गरम करण्याचे प्लांट आहेत. इथून शेतकऱ्यांनी बी शोधून ऊस पेरणी करावी.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.