नवी दिल्ली : ईएफओ (एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड) अंतर्गत येणारे कामगार आणि पेन्शनरांना प्रत्येक महिन्याला किमान 7500 रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळावी, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीने (एनएसी) देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनांतर्गत पुढच्या महिन्यात रास्ता रोकोचा पहिला टप्पा करण्यात येईल. हा रास्ता रोको नवी दिल्लीमध्ये होणार आहे.
एनएसी चे राष्ट्रीय संयोजक आणि अध्यक्ष अशोक राउत म्हणाले, तीस वर्षे कार्यरत राहूनही आणि ईपीएस वर आधारीत पेन्शनमध्ये निरंतर योगदान करुनही कामगारांना पेन्शनच्या रुपात दरमहा 2500 रुपयेच मिळतात. या तुटमुंज्या रकमेमध्ये उदरनिर्वाह करणे कठीण जात आहे. म्हणूनच ईपीएस 95 च्या अंतर्गत येणार्या कामगारांच्या दरमहा मूळ पेन्शनच्या रुपात 7500 रुपयांसह महागाई भत्ता, कामगाराच्या पत्नी किंवा पतीलाही मोफत सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
राउत म्हणाले, आम्ही गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारला कर्मचारी पेन्शन योजनेसाठी (ईपीएस95) पात्र असणार्या कर्मचार्यांची पेन्शन वाढवून दरमहा 7,000 रुपयांवर नेण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये महागाई भत्त्याचाही अंतर्भाव केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात आम्ही येत्या सात डिसेंबरला दिल्लीमध्ये रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. या शिवाय संबंधितांकडून स्थानिक स्तरावरही आंदोलने करण्यात येणार आहेत,
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.