किंगस्टन (जमैका) : 2019-20 या हंगामासाठी सरकारकडून क्लेरेंडन मध्ये मोनिमस्क पासून सेंट कैथरीन मध्ये वर्थ पार्क एस्टेट आणि सेंट एलिजाबेथ मध्ये एपलटन एस्टेट पर्यंतच्या ऊस वाहतुकीसाठी अतिरिक्त 200 इशलक्ष अमेरिकन डॉलर्स देईल, असे आश्वासन उद्योग, वाणिज्य, कृषी आणि मत्स्य पालन मंत्री शॉली शॉ यांनी ऑल आयलंड केन्स फार्मर्स असोसिएशन च्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले.
मंत्री शॉ म्हणाले, हा निर्णय सेंट कैथरीन आणि क्लेरेंडन च्या लहान शेतकर्यांच्या सहकार्यासाठी घेतला आहे. आम्ही ऊस लागवडीच्या सोयीसाठी हे करत आहोत, कारण कारखान्यांना ऊसाची मोठी गरज आहे. ते म्हणाले, 2018 मध्ये साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने असूनही साखर उद्योगाने घरगुती उत्पादनात (जीडीपी) 0.5 टक्क्यांचे योगदान दिले आहे आणि 20,000 प्रत्यक्ष नोकर्यांबराबेर 80,000 अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मितीही केली आहे. राष्ट्राच्या व्यापारात साखर उद्योगाची भूमिका महत्वपूर्ण आहे. शॉ म्हणाले की, साखर उद्योगाला योग्य मार्ग दाखवणे आणि लहान शेतकर्यांना अधिक सेवा सुविधा प्रदान करणे हे सरकारचे ध्येय आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.