गेल्याच महिन्यात रिलायन्सच्या बाजार भांडवलाने 9 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाची नोंद केली होती. चालू वर्षात रिलायन्सच्या समभागाने 34 टक्के वृद्धी साधली आहे. मुंबई शेअर बाजारात रिलायन्सनंतर टीसीएसचा (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) क्रमांक लागतो. टीसीएसचे बाजार भांडवल 7.91 लाख कोटी रुपये आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलाने मंगळवारी 9.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला.
जागतिक बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी 185 अंकांनी वधारला व 40469 वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 55 अंकांच्या वाढीसह 11940 वर पोहोचला. रिलायन्स व्यतिरिक्त एचडीएफसी बँक, व्होडाफोन आयडिया व भारती एअरटेलच्या समभागांनी मोठी कमाई केली.
दरवाढीची घोषणा करणार्या एअरटेलच्या समभागाचे मूल्य 7.36 टक्क्यांनी तर व्होडाफोनच्या समभागाचे मूल्य तब्बल 34.68 टक्क्यांनी वाढले. गेल्या तिमाहीत विक्रमी तोटयाच्या नोंदीला सामोरे जावे लागलेल्या व्होडाफोन आयडिया तसेच भारती एअरटेलने सोमवारीच मोबाइल शुल्कवाढीचा निर्णय जाहीर केला. वाढीव दर येत्या 1 डिसेंबरपासून लागू होतील असे स्पष्ट करतानाच नेमक्या किती प्रमाणात व कोणत्या सेवेचे दर वाढतील, हे मात्र जाहीर केले नाही. अशी कामगिरी नोंदवणारी रिलायन्स ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली. सत्रांतर्गत व्यवहारात रिलायन्सचा समभाग साडेतीन टक्क्यांनी वधारून 1,509.80 वर स्थिरावला
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.