महाराष्ट्रात 125 साखर कारखान्यांना मिळाला गाळप परवाना

पुणे : महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी राज्याचे राज्यपाल बी एस कोश्यारी यांच्याकडून अनुमती मिळाल्यानंतर ऊस गाळप हंगाम सुरु केला आहे. राज्यापालांनी 22 नांव्हेंबरला हंगाम सुरु करण्याची परवानगी दिली होती. पण साखर कारखान्यांनी खूपच मंद गतीने ऊस गाळपास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र चे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे की, साखर हंगाम 2019-20 साठी 162 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला होता. आतापर्यंत, 125 कारखान्यांना गाळप परवाना जारी केला आहे. 15 साखर कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली आहे.

साखर हंगाम 2018-19 मध्ये महाराष्ट्रात एकूण 195 साखर कारखान्यांनी गाळपामध्ये भाग घेतला होता आणि 951.79 लाख टन ऊसाचे गाळप करुन 11.26 टक्क्याची रिकव्हरी दराप्रमाणे 107.19 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. या हंगामात, महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन कमी होण्याची संभावना आहे, कारण राज्य अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त होते.

कोल्हापूर आणि सांगली क्षेत्रातील अधिकांश साखर कारखान्यांनी अजूनपर्यंत गाळपास सुरुवात केली नाही, कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना चेतावणी दिली आहे की, ऊसाच्या निर्धारित मूल्याबाबत अंतिम निर्णय येईपर्यंत ऊस गाळप सुरु होणार नाही. एफआरपी बरोबर ऊसाच्या प्रति टनावर 200 रुपये मिळावेत या मागणीवर संघटना अडून बसली आहे. तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी असा दावा केला आहे की, त्यांची मागणी पूर्ण करणे कठीण आहे कारण साखर उद्योग साखरेचा अतिरिक्त साठा आणि आर्थिक समस्येशी झगडत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here