नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील कारखान्यांनी आता गाळपाला सुरुवात केली आहे. या कारखान्याला ऊस पुरवठा करणारे ऊसतोड कामगारांचे तांडे दाखल झाले आहेत. पण सततच्या पावसाळी वातावरणामुळे येथील अस्ट्रोरिया साखर कारखान्याचा हंगाम लांबला आहे. पण आता हंगामाला गती आली आहे.
गाळपासाठी बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार बैलगाड्यांसह दाखल झाले असून त्यांच्याकडून ऊसतोडणीसाठी सुरुवात करण्यात येत आहे. हे काम पहाटेपासून सुरु होवून दुपारी 12 वाजपर्यंत सुरु राहील. ऊसतोड झालेला ऊस बैलगाडीच्या माध्यमातून कारखान्यापर्यंत पोचत आहे. हे काम कौटुंबिकरित्या करण्यात येत आहे. याठिकाणी ऊसतोडणीसाठी धडगाव तालुक्यातील बोदला व चोंदवाडा येथूनही कामगार आले आहेत.
या कामगारांना एका टन ऊसाला 340 रुपयाचा मोबदला देण्यात येत आहे. यामुळेच हे ऊसतोडणीचे काम सामुदायिक पद्धतीने करण्यात येत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.