35 लाख जिंकण्याची बिल गेटस कडून ऑफर

मुंबई: देशातील बहुतांशी जणांकडे फीचर्स फोन असल्यामुळे स्मार्टफोनद्वारे होणार्‍या यूपीआय व्यवहाराचा फायदा घेऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता फीचर फोन असणार्‍यांनाही डिजीटल व्यवहार करता यावे यासाठी एक पेमेंट सोल्यूशन विकसित करण्याचे चॅलेंज घोषित करण्यात आले आहे. हे चॅलेंज पार जिंकणार्‍याला 35 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आलेआहे .

फीचर फोनसाठी पेमेंट सोल्यूशन तयार करण्यासाठी हे खुले जागतिक स्तरावरील चॅलेंज आहे. यामध्ये व्यक्तीगत आणि व्यावसायिक उपक्रम दोन्हीजण सहभाग घेऊ शकतात. या चॅलेंजसाठी नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बिल गेटस फौंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

एनपीसीआयने या चॅलेंजसाठी इच्छुक असणार्‍यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांना 12 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. फक्त ऑनलाइन पद्धतीने येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. निवडण्यात आलेले स्पर्धक स्टार्टअप स्पर्धकांना 11 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here