.पुणे : केंद्र सरकारने दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन लाख 44 हजार 676 शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. तर, दुसऱ्या टप्प्यात एक लाख 96 हजार 770 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु या योजनेचा गैरवापर होत असल्यामुळे एक ऑगस्टपासून बँक खात्याशी आधार जोडणीची सक्ती करण्यात आली आहे. या योजनेला आधार ने घेराव घातला आहे.
आधार जोडणी केली तरच तिसऱ्या टप्प्यातील एक लाख 32 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु ३० डिसेंबर पर्यंत आधार जोडणी न केल्यास जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३२ हजार शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आधार जोडणीसाठी पुरेसा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.