केसनंद (पुणे) : शिरुर मतदारसंघातील शेतकर्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला यशवंत साखर कारखाना सुरू व्हावा, ही येथील सर्व शेतकर्यांची इच्छा आहे. हा विषय राज्य सरकारकडे अनेकदा मांडूनही अद्याप यावर तोडगा निघू शकलेला नाही. यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटले. त्या वेळी हि मागणी करण्यात अली . तसेच, शिरूर विधानसभा मतदार संघातील महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख कटके, खेडचे माजी आमदार सुरेश गोरे, जिल्हा युवा सेना अधिकारी मच्छिंद्र सातव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रश्नी संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचेही कटके यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.