मनागुआ : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या कमी किंमतीमुळे,निकारागुआ ला साखर निर्यातीमुळे मिळणारा रेव्हेन्यू कमी झाला आहे आणि याचा परिणाम देशातील साखर उद्योगावर झाला आहे.
निकारागुआमध्ये 2018 च्या तुलनेत, वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यामध्ये देशातील साखर निर्यात रेव्हेन्यूत 14 टक्क्यांनी घट होवून 162.94 दशलक्ष अमेरिकी डॉलर राहिले आहे. तर यावर्षीच्या समान कालावधीत साखर निर्यातीची मात्रा 28,639 मेट्रीक टन इतकी वाढून 511,105 मेट्रीक टन झाली आहे.
निकारागुआ मध्ये ऊस गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरु झाला आहे, जो पुढच्या वर्षाच्या मेमध्ये संपेल. इथले ऊस उद्योगाशी निगडित असणारी संघटना सीएनपीए यांनी सांगितले की, चालू हंगामात देशातील कारखान्यात 17.5 दशलक्ष क्विंटल ऊस गाळप होण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.