पूर्णा : बळीराजा साखर कारखान्यात आरबीसी विभागात काम करणार्या ओम चांदोजी रेनगडे या कंत्राटी कामगाराचा साखळीत अडकून मृत्यु झाला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार, कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखान्यात ऊस गाळप सुरु आहे. कारखान्यात कंत्राटी कामगारही काम करत आहेत. यामध्ये ओम रेनगडे हा या ठिकाणी बॉयलरसाठी लागणारा भुसा भरण्याचे काम करत असे. हा भुसा भरत असताना आरबीसी यंत्रणेत त्याचा पाय अडकला. त्यातच त्याचा मृत्यु झाला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, जमादार सय्यद मोईन, समीर पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी घटनास्थळी धाव घेत मृत तरुणाच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.