काहनूवान, पंजाब : ऊस शेतकऱ्यांना मजूरांची कमी जाणवत आहे. गाळप हंगाम सुरू झाला असून मजूरां अभावी शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी अजूनही न झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
ऊस शेतकरी लखविदर सिंह जागोवाल यांनी सांगितले की, फार आधीपासूनच शेतमजूरांची कमी जाणवत आहे, पण यावेळी हे प्रमाण वाढले आहे. अधिक मजूरी दिली तरीही लोक मिळत नाहीत. साखर कारखान्यांनी वेळेआधी गाळपास सुरुवात केली आहे. कारखान्यांनी ऊसाचे ओळखपत्रही शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. पण जर ऊस तोडणीच होत नसेल तर या ओळखपत्रांचा काय उपयोग. ही अडचण लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी ओळखपत्र दिल्यानंतर ऊस गाळपाचा वेळ ९६ तासांनी वाढवला आहे.
ऊस शेतकरी सुखविंदर सिंह यांनी सांगितले की, जोपर्यंत ऊस तोडणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत शेतकरी गव्हाचे पीक घेऊ शकत नाहीत. म्हणूनच मजूरांना आणण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.